Raigad Accident: कर्जतमध्ये भीषण अपघात, कार ओव्हरटेक करताना वृद्ध दांपत्याला उडवलं, मध्यप्रदेशच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या एका सेलेरिओ कारने वृद्ध दांपत्याचा स्कुटीला जोरदार धडक दिली या धडकेत या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला.

Raigad Accident: रायगडच्या कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब मार्गावर रविवारी भीषण अपघात झाला. वरई गावाजवळील एक्सपेरिया साईट रोडवर कार आणि स्कुटीची समोरासमोर धडक होऊन वृद्ध दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या सेलेरिओ कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. या धडकेत वृद्ध दांपत्य रस्त्यावर दूर फेकले गेले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

नेमकं झालं काय?

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. वेग, निष्काळजीपणा आणि वाहतुकीचे नियम पाळण्यात येणारी हलगर्जीपणा या कारणांमुळे अनेक ठिकाणी जीवितहानी होत आहे. कर्जत तालुक्यातील वरई येथील एक्सपेरिया साईट रोडवर भीषण अपघात झाला या अपघातात एका वृद्ध दांपत्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या एका सेलेरिओ कारने वृद्ध दांपत्याचा स्कुटीला जोरदार धडक दिली या धडकेत या दांपत्याचा जागीच मृत्यू झाला.त्यामुळे बेदरकार चालक संस्कार मुकेश अंजने वय 24 राहणार मध्यप्रदेश याला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. नेरळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कार चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव संस्कार मुकेश अंजने (वय 24, रा. मध्यप्रदेश) असे आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. अपघातग्रस्त स्कुटीवर असलेले वृद्ध दांपत्य हे नियमितपणे या मार्गावरून प्रवास करत होते. त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे नेरळ परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास नेरळ पोलीस करत आहेत. अपघातानंतर कार चालकाला लोकांनी पकडून नेरळ पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीचे नाव संस्कार मुकेश अंजने (वय 24, रा. मध्यप्रदेश) असे असून, त्याच्यावर निष्काळजीपणाने वाहन चालवून मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.